बंगळुरू हादरले! आधी दोन्ही मुलांना विष पाजले, नंतर पती पत्नीने केली स्वत:चं जीवन संपवलं
कर्नाटकातील बंगळुरू शहरात एका तरुण पती पत्नीने आपल्या पाच व दोन वर्षांच्या मुलांना विष पाजले. त्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर या दाम्पत्याने देखील गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं.
अनुप कुमार (38) आणि राखी (35) असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे होते. अनुप बंगळुरू मध्ये एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर कन्स्लटंट होता. तर राखी गृहिणी होती.
सोमवारी सकाळी अनुप कुमार यांच्या घरी काम करणाऱ्या बाईने दरवाजा ठोकवला. मात्र बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तिने त्यांना कॉल केला. मात्र दोघांनीही फोन उचलला नाही. त्यामुळे तिने याबाबत शेजाऱ्यांना सांगितले व त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी येताच त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी अनुप राखी छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले. तर दोन्ही मुलं मृतावस्थेत जमिनीवर पडलेली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List