तो नेहमीच एक महान कर्णधार असेल, टीका करणं सोपं…; युवराज सिंगने घेतली रोहित-विराटची बाजू
हिंदुस्थानी संघ गेल्या काही महिन्यांपासून खराब कामगिरीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडने दिलेला व्हाईटवॉश (0-3) आणि आता बॉर्डर गावस्कर कंरडकातील मालिका पराभव. त्यामुळे संघातील खेळाडू विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे काही माजी खेळाडूंनी म्हंटले आहे. या सर्व प्रकरणावर टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने रोहित आणि विराटसह हिंदुस्थानी संघाची बाजू घेत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
युवराज सिंगने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही खेळाडूंच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मला वाटतंय की घराच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव अत्यंत क्लेशदायक आहे. BGT पराभव एकवेळ स्विकारला जाऊ शकतो, कारण यापूर्वी दोन वेळा आपण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलो आहे. त्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत मजबूत संघ राहिला आहे, असे म्हणत त्याने टीम इंडियाची बाजू घेतली आहे.
रोहित आणि विराटच्या कामगिरीसंदर्भात त्याला प्रश्न विचारला असता. तो म्हणाला की, आपण आपले दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या बाबत अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहोत. लोकं विसरून जातात की त्यांनी यापूर्वी देशासाठी काय योगदान दिले आहे. सध्याच्या घडीला महान खेळाडूंमध्ये त्यांनी नावं घेतली जातात. ठीक आहे त्यांचा पराभव झाला. त्यांनी चांगले क्रिकेट खेळले नाही. आपल्यापेक्षाही ते जास्त दु:खी आहेत, असे युवराज सिंग म्हणाला आहे.
मला वाटतंय की रोहित हा एक महान कर्णधार आहे. म भले पराभव होऊ अथवा विजय, तो नेहमीच एक महान कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वात आपण वनडे विश्वचषख फायलन खेळली. आपण टी-20 विश्वचषक जिंकला. आपण बरेच काही मिळवले आहे. त्यांच्यावर टीका करणे सोपे आहे, परंतु त्यांचे समर्थन करणे कठीण, अशा शब्दात युवराजने रोहित शर्माची बाजू मांडत टीकाकारांचे तोंड एक प्रकारे बंद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List