आसाराम बापूला वैद्यकीय कारणाने सशर्त जामीन; अनुयायी, शिष्यांना भेटू शकणार नाही
आसाराम बापूला 2 प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 साली इंदूर येथील आश्रमातून अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू तुरुंगात आहे. बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याला वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीनाच्या कालावधीत तो त्याच्या कोणत्याही अनुयायाला, शिष्याला भेटू शकणार नाही. त्याला 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून ‘भगत की कोठी’ येथील आरोग्य सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आसाराम हृदयरोगी असून त्याला हृदयविकाराचा झटकाही आला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव त्याला जामीन मंजूर केला आहे. 2013 मधील एका बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील स्थानिक न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून आसाराम तुरूंगात आहेत. वैद्यकीय पार्श्वभूमीवर आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे. अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्ती लावल्या आहेत. या कालावधीत ते शिष्य, अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत. न्यायालयाने आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. पुरावे मिटवण्याचा अथवा त्यांच्याशी छेडछाड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना दिले. या कालावधीत ते शिष्य, अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत. अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने या अटी आणि शर्ती लावल्या आहेत. त्याचे त्यांना काटेकोर पालन करावे लागेल.
आसारामवर सध्या तुरुंगात उपचार सुरू आहेत. तुरूंगातील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांना हृदयरोग आहे. यापूर्वी बापूला हृदय विकाराचा झटका आला आहे. याआधीही त्यांना न्यायालयाने मेडिकल ग्राऊंडवर बापूला जामीन मंजूर केला होता. जामीन मिळावा यासाठी आसाराम बापूकडून अनेकदा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी अर्ज दाखल केला असता, केवळ वैद्यकीय कारणाबाबतच विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कारणांचा विचार केल्या जाणार नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. शिक्षा कमी करण्यासाठी आसारामने विनंती केली होती. पण ही याचिका गुन्ह्याची गंभीरता पाहता नाकरण्यात आली. त्यानंतर मंगळवारी आसारामला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
प्रकरणातील पीडितेच्या बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साईविरोधात बलात्काराची तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणात नारायण साईला एप्रिल 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसारामला ज्याप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली, त्याचा गुन्हा 2013 मध्ये नोंदवण्यात आला आहे. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या नारायण साई हा तुरुंगात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List