राजीनाम्याच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी…
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान सोमवारी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
अजित पवार यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे सांगितले आहे. ”आमची विविध विषयांवर चर्चा झाली मात्र मंत्रीपदाचा राजीनाम्याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या हत्या प्रकरणाशी असलेला संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि वाल्मीक कराडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List