लक्षवेधक – कोल्ड्रिंक्सवरचा खर्च 24 टक्क्यांनी वाढला
हिंदुस्थानात राहणारी व्यक्ती कोणत्या गोष्टींवर किती खर्च करतेय याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी खात्याने जाहीर केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फास्टफूड आणि कोल्ड्रिंक्ससारख्या गोष्टींवर होणाऱ्या खर्चात 24 टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालातून समोर आले आहे, तर भाजीपाल्यावर होणारा खर्च 11 टक्क्यांनी कमी झाला आहे. वैद्यकीय 6.83 टक्के, मनोरंजन 6.22 टक्के, भाडे 6.58 टक्के, शिक्षण 5.97 टक्के, वाहतूक 7.59 टक्के, कपडे 6.63 टक्के खर्च केला जात आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
‘पुष्पा-2’ ची 31 दिवसांत 806 कोटींची कमाई
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा-2’ ने आतापर्यंत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘पुष्पा-2’ ने हिंदी भाषेत अवघ्या 31 दिवसांत 806 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात तब्बल साडेअठराशे कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सारा अली खान देवदर्शनासाठी आंध्रात
अभिनेत्री सारा अली खान हिने नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली आहे. तिने नुकतीच आंध्र प्रदेशातील 12 ज्योतार्ंलगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. यासंबंधीचे फोटोसुद्धा तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे. आरबीआयमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2025 पर्यंत आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली रिजनअंतर्गत येणाऱ्या एकूण चार झोन्समध्ये ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल) पदांची भरती केली जाणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List