पालिकेचे तीन हजार कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्येदेखील दिनांक 5 मे 2008 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पालिकेचे तीन हजार कर्मचारी वेटिंगवर आहेत. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत असून याबाबत कर्मचारी संघटना 10 जानेवारी रोजी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित होऊन त्याआधारे 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना पेंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेनेदेखील अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा महानगरपालिका कर्मचाऱ्यांची आहे. मात्र शासनाने परिपत्रक प्रसारित करून एक वर्ष उलटले तरीही मुंबई महानगरपालिका प्रशासन याबाबत निर्णय घेत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग नाराज आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List