EVM हॅक होते की नाही? निवडणूक आयोगाने चॅलेंज जाहीर करावं; आदित्य ठाकरे यांचे आव्हान
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. तसेच ईव्हीएमवरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहेत. ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रेयवर निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून निवडणूक आयोगाने आमच्या आणि जनतेच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी केली आहे.
ईव्हीएम हॅक करता येतो किंवा नाही, यासाठी त्यांनी चॅलेंज जाहीर करावे,अनेक तज्ज्ञ आणि जनताच त्यांना खरे काय आहे, ते दाखवून देईल. अशाप्रकारचे चॅलेंज त्यांनी जाहीर करावे, त्यानंतर सत्य उघड होईल. तसेच त्यांनी एक प्रयोग करून बघावा, ईव्हीएम ठेवा आणि त्याच्या शेजारी बॅलेट पेपरवर मतदानाच्या चिठ्ठ्या ठेवा, बघूया कशाप्रकारे मतदान होते. त्यातील तफावतही त्यांना दिसून येईल.
2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे वर्तन इन्टायर कॉम्पमाईज कमीशनसारखे होते, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. आम्ही त्यांचे वर्तन जवळून पाहिले आहे. त्यामुळे ते पारदर्शकतेचे दावे करत आहेत, तर त्यांनी आमच्या आणि जनतेच्या शंकांचे निरसन करावे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List