ऐन हिवाळ्यात पाऊस व गारपीटीचा इशारा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील शेतकरी चिंतेत
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस या भागात अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तरेकडे थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आठवड्याच्या अखेरपर्यंत थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी वेगाने वादळी वाऱे वाहून पाऊन पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना आहे पावसाचा इशारा
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. तर नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List