युवासेनेकडून विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ परिपत्रकाची होळी; आंदोलनाला मज्जाव, दंडात्मक कारवाईचा निषेध
विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक आंदोलनाला मज्जाव आणि असे करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे परिपत्रक विद्यापीठाने मागे घ्यावे तसेच एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा होणाऱया पेट परीक्षेतील घोळासंदर्भात उच्च तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भेट नाकारल्यामुळे युवासेनेच्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ दंडाला काळ्या फिती बांधून परिपत्रकाची होळी करण्यात आली.
युवासेनेच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सर्व सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून पदवीदान समारंभावेळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे, परमात्मा यादव, अल्पेश भोईर, मयूर पांचाळ, किसन सावंत, स्नेहा गवळी, व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साटम, शिवसेना उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेतले नाही, परिपत्रक रद्द केले नाही तर युवासेना ठिय्या आंदोलन करेल, प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा इशारा युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List