परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे; वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना आवाहन

परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे; वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक मंगळवारी इंद्रप्रस्थ हॉल देवगड सातपायरी येथे झाली. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण सातत्याने जनतेचे काम करीत राहिले पाहिजे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. आजची परिस्थिती उद्या नक्की बदलेल, मात्र परिवर्तनासाठी आत्तापासूनच संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत असा विश्वास शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. तसेच कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनीही बैठकीत सांगितले की, जनतेची छोटी मोठी कामे करणे, विविध योजनांचा लाभ मिळवून देणे ही कामे अविरतपणे आपण सुरु ठेवली पाहिजे. येणाऱ्या काळात पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकजूट टिकवून ठेवणे आणि जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे आहे. आता जनता नक्कीच आपल्याला साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, नगरसेवक बुवा तारी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,हर्षा ठाकूर,संतोष तारी, वर्षा पवार,सरपंच मेनिका पुजारे,रमाकांत राणे,विशाल मांजरेकर, संदीप ढोलकर,सरपंच पूर्वा जाधव, सुनील जाधव, बाजीराव जाधव, सचिन खडपे, यदुनाथ ठाकूर, सरपंच दीपक कदम, मंगेश पाठक,फरीद काझी आदींसह शिवसेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रकरण तापलं! ‘जर मुंडे, कराड यांच्याकडून…’, अंजली दमानियांचा लक्ष्मण हाकेंना थेट इशारा प्रकरण तापलं! ‘जर मुंडे, कराड यांच्याकडून…’, अंजली दमानियांचा लक्ष्मण हाकेंना थेट इशारा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये बोलताना त्यांनी आमदार सुरेश धस, मराठा आरक्षण...
दिल्लीत अजितदादा अमित शाहांना भेटले? बैठकीत नेमकी कशावर चर्चा?
धारावी सोशल मिशनच्या ‘रिसोर्स सेंटर’चे लोकार्पण, वर्षभरात कौशल्य विकासाच्या 10,000 संधी, तर 3000 रोजगार
कुणी फेकल्या अस्थी,कोणी लघवीच्या बाटल्या, तर कोणी फेकलं जिवंत वटवाघूळ; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना आलेले भयानक प्रसंग
कंगना रणौत ते सलमान खानपर्यंत; बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रिटींनी भर गर्दीत खाल्लाय मार
सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात घसरण
यांनी तर रानबाजार मांडला आहे, उत्तम जानकर यांचा धनंजय मुंडेवर निशाणा