पराभवाने खचून जाऊ नका, लढा सुरू ठेवा नक्की यश मिळेल; संदेश पारकर यांचा विश्वास

पराभवाने खचून जाऊ नका, लढा सुरू ठेवा नक्की यश मिळेल; संदेश पारकर यांचा विश्वास

विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी पराभवाला खचून जाऊ नका. पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्वांनी काम करूया. एकसंघ आणि एकजुटीने कार्यरत राहून शिवसेनेला बळकटी देऊ या. एकदिवस आपल्या लढ्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी मातोश्री हॉल येथे झाली. या बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे.मात्र जनतेने दिलेला कौल मान्य करून येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम आपण करणार आहोत. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आपल्याला लढावेच लागेल. प्रत्येकाला संधी मिळत असते भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल त्यासाठी आपण काम करीत राहिले पाहिजे. कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम यापुढेही आपण सुरु ठेवले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडले पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम पालव,उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,उपतालुका प्रमुख बाबू पेडणेकर,आबू पटेल, जयसिंग नाईक,महिला तालुका संघटक वैदेही गाडेकर,उपतालुका संघटक संजना कोलते,युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग,तात्या निकम,धनश्री मेस्त्री,राजू राठोड, सचिन सावंत,तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, राजू रावराणे,विलास गुडेकर, धीरज मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं  संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात...
बाप-लेकीला सोडून दादांसोबत चला, शरद पवार गटाच्या खासदारांना तटकरे यांचा सल्ला?
‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पी-अर्जुनची राजकारण्यांशी लढाई; कथा रंजक वळणावर
‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा’; कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर
रॅबिट फीव्हर म्हणजे काय? लक्षणे कोणती? जाणून घ्या
या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…
Video – अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेते साहेबांचा आदर करतात, तटकरेंचं सांगता येत नाही!