एका फ्रेममध्ये सगळे, ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊत यांचा महायुती सरकावर निशाणा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटो या तिघांसोबत धनंजय मुंडे देखील असून वाल्मीक कराड त्यांच्या बाजूला उभा आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
एका फ्रेममध्ये सगळे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का?
मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत
ग्रामस्थ म्हणतायेत “सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे”.
अगतिक जनता pic.twitter.com/4MSWOLi3iO— Sanjay Raut (@rautsanjay61) January 7, 2025
”एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? असा सवाल संजय राऊत यांनी या ट्विटमधून केला आहे. तसेच ‘मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता’, असे देखील त्यांनी या ट्विटमध्ये लिहले आहे.
वाल्मीक कराडला तुरुंगात हवा पूर्णवेळ मदतनीस
वाल्मीक कराडची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे. दरम्यान वाल्मीक कराडने त्याला पूर्णवेळ मदतनीस मिळावा म्हणून केज न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘आपल्याला स्लिप अॅप्निया हा आजार असून या आजारात झोपताना ऑटो सीपॅप ही मशून लावली जाते, असे त्याने या याचिकेत म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List