दीड लाखाहून जास्त विद्यार्थ्यांना पदव्या
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे झाला. विविध विद्याशाखांतील 1 लाख 64 हजार 465 विद्यार्थ्यांना पदव्या, 401 विद्यार्थ्यांना पीएचडी तर 20 पदके प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे उपस्थित होते. समारंभाचे अतिथी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, सेंट लुईस विद्यापीठ, सेंट लुईस, मिसोरी राज्य, अमेरिकाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List