GDP आणखी घसरणार, अर्थव्यवस्था मंदावणार? वाचा NSO ने काय वर्तवला अंदाज

GDP आणखी घसरणार, अर्थव्यवस्था मंदावणार? वाचा NSO ने काय वर्तवला अंदाज

जागितक आर्थिक स्तरावर अस्वस्थतेचे सावट आहे. तसेच युरोपीय देशांमध्ये मंदीचे संकटही घोघांवत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक वृत्त आले आहे. आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये सर्वात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जीडीपीचा दर 6.4 टक्क्यापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या जीडीपीच्या तुलनेत ही घट मोठी आहे. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था मंदावत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

2024-25 या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) आगाऊ अंदाज जारी करताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) म्हटले आहे की या आर्थिक वर्षात GDP चा दर 6.4 टक्के राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी वाढीचा तात्पुरता अंदाज 8.2 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा विचार करता जीडीपीत मोठी घट असल्याचे दिसून येत आहे.

चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा जीडीपी 6.4 टक्के असू शकतो, असा सरकारचा अंदाज आहे. याबाबत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO ने अंदाज जारी केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 8.2 टक्के होता. एनएसओचा अंदाजानुसार गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात देशाची वाढ खूपच कमी होत असल्याचे दिसते.

चालू आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा आगाऊ अंदाज जारी करताना, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सांगितले की, देशाचा जीडीपी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.4 टक्के दराने असेल, तर गेल्या आर्थिक वर्षात त्याचा विकास दर 6.4 टक्के होता. तर तो 8.2 टक्के होता. 2020-21 या आर्थिक वर्षानंतर देशाची अर्थव्यवस्था कमी गतीने वाढत आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत 5.8 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती. कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर 2021-22 मध्ये 9.7 टक्के, 2022-23 मध्ये 7 टक्के आणि 2023-24 आर्थिक वर्षात 8.2 टक्के या उच्च दराने वाढ झाली.

2024-25 या आर्थिक वर्षासाठी NSO चा 6.4 टक्के वाढीचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अंदाजापेक्षा कमी आहे. आरबीआयने डिसेंबर 2024 मध्ये जारी केलेल्या अंदाजात म्हटले होते की चालू आर्थिक वर्षात जीडीपी 6.6 टक्के दराने वाढेल. याशिवाय एनएसओचा हा अंदाजही अर्थ मंत्रालयाच्या अंदाजापेक्षा कमी आहे. वित्त मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात 6.5 ते 7 टक्के जीडीपी वाढीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता.

उत्पादन क्षेत्राची वाढ गेल्या आर्थिक वर्षातील 9.9 टक्क्यांवरून 5.3 टक्क्यांपर्यंत घसरेल. याशिवाय, व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण यासह सेवा क्षेत्रातील वाढीचा दर 2023-24 मध्ये 6.4 टक्के होता 5.8 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. मात्र, कृषी क्षेत्राच्या कामगिरीमुळे अर्थव्यवस्थेला दिलासा मिळू शकेल. चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने 3.8 टक्के वाढ अपेक्षित आहे जी मागील आर्थिक वर्षात 1.4 टक्के होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रकरण तापलं! ‘जर मुंडे, कराड यांच्याकडून…’, अंजली दमानियांचा लक्ष्मण हाकेंना थेट इशारा प्रकरण तापलं! ‘जर मुंडे, कराड यांच्याकडून…’, अंजली दमानियांचा लक्ष्मण हाकेंना थेट इशारा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये बोलताना त्यांनी आमदार सुरेश धस, मराठा आरक्षण...
दिल्लीत अजितदादा अमित शाहांना भेटले? बैठकीत नेमकी कशावर चर्चा?
धारावी सोशल मिशनच्या ‘रिसोर्स सेंटर’चे लोकार्पण, वर्षभरात कौशल्य विकासाच्या 10,000 संधी, तर 3000 रोजगार
कुणी फेकल्या अस्थी,कोणी लघवीच्या बाटल्या, तर कोणी फेकलं जिवंत वटवाघूळ; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायकांना आलेले भयानक प्रसंग
कंगना रणौत ते सलमान खानपर्यंत; बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रिटींनी भर गर्दीत खाल्लाय मार
सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात घसरण
यांनी तर रानबाजार मांडला आहे, उत्तम जानकर यांचा धनंजय मुंडेवर निशाणा