Pune News उसन्या पैशाच्या वादातून तरुणीची कोयत्याने वार करून हत्या
उसन्या पैशाच्या वादातून कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्याने कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा भागात घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली.
शुभदा शंकर कोदारे वय 28 , रा. बालाजी नगर, कात्रज असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला येरवडा पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा मूळची सातारची होती. ती डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीत कामाला होती. त्याच कंपनीत आरोपी कृष्णा कामाला असल्याने दोघांची ओळख होती. त्यांच्यात उसन्या पैशावरून वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारात शुभदा काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तेथे थांबलेल्या कृष्णाने तिच्याशी वाद घालून कोयत्याने वार केले. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले.उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List