सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क
सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनासुद्धा हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने पाकले टाकली असून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् म्हणजे बीआयएसला त्याच्या क्याकहारिक पैलूंचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे, अशी माहिती अन्न क ग्राहक क्यकहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे चांदीतील भेसळ रोखण्यासाठी हॉलमार्किंग आणले जाणार आहे. चांदीच्या ‘हॉलमार्किंग’साठी ग्राहकांकडून मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे, असे जोशी म्हणाले. बीआयएस आणि ग्राहक क ज्केलरी किक्रेत्यांकडून यासंबंधी फीडबॅक घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, 2019 मध्ये सरकारने सोन्याची शुद्धता निश्चित करण्यासाठी हॉलमार्किंग अनिकार्य केले होते. सोन्याची शुद्धता 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटमध्ये किभागली जाते.
‘हॉलमार्किंग’ प्रणालीमध्ये सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक कोड’ असतो, जो सोन्याची शुद्धता प्रमाणित करतो. हॉलमार्किंग सिस्टम आल्यानंतर चांदी आणि चांदीच्या कस्तूंतील भेसळ दूर होणार आहे. तसेच ग्राहकांना योग्य माल मिळणे सोपे होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List