भाषणं काय करता, खऱ्या आरोपींना पकडायची हिंमत आहे का देवेंद्र फडणवीसांमध्ये? संजय राऊत यांचे टीकास्त्र

भाषणं काय करता, खऱ्या आरोपींना पकडायची हिंमत आहे का देवेंद्र फडणवीसांमध्ये? संजय राऊत यांचे टीकास्त्र

संतोष देशमुख यांच्या खूनाच्या कारस्थानात ज्यांचा हात आहे त्या व्यक्तीचा मंत्रीमंडळात समावेश आहे. या खऱ्या आरोपींना पकडायची हिंमत आहे का देवेंद्र फडणवीसांमध्ये? अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

”महाराष्ट्रातील कायदे सुव्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलत आहेत. संतोष देशमुखची हत्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर झाली आहे. व्हिडीओ आहेत त्याचे तरीही तुम्ही ते लपवायचा प्रयत्न करताय. महराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक, काळीमा फासणाऱ्या आहेत आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित संशयित आरोपी आपल्या मंत्रीमंडळात बसलेले आहेत. आपण त्यांना घेतलेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. सरकारची जबाबदारी होती त्यांचे प्राण वाचवायची. ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांना पाठिशी घालताय. याच्यावर बोला. खरंतर मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी जस्टिस सुब्रमण्यम यांची कालच नेमणूक झाली. पण सगळे गुलाम आहेत मोदींचे. कुठे आहे माणूसकी. हा महाराष्ट्र मानवता व माणूसकीसाठी ओळखला जात होता. गेल्या पाच वर्षात या महाराष्ट्रात रोज माणूसकीचा खून होतोय. देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलतायत. आम्हाला लाज वाटते याची, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांनवर निशाणा साधळा.

”फडणवीस न्यायाच्या गोष्टी करता. स्वत: एकदा बीडला जा. राहुल गांधी परभणीला गेले याने आपलं पित्त का खवळावं. राहुल गांधी विरोधीपक्षनेते आहेत. संविधानाने त्यांना जो दर्जा दिला आहे तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना भाजपने दिलेला नाही. जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा आपण त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळू दिले नाही. आपण गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून जायला हवे होते. आपल्याला भिती वाटते जायची. गेलात तरी सैन्य घेऊन जाल. राहुल गांधींवर टीका करता द्वेष पसरवता म्हणून पण जर त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निदर्यी आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट 40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट
लाडक्या बहिणींना कमळाबाईने न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेला आहे, तर काही भाज्या 30 ते...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी यांचे निधन
राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर बंदी घाला, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
‘शक्ती’ कायद्याची फाईल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, शिवसेनेच्या मागणीला यश
पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या चमकोगिरीच्या ‘चॅनल’ बैठका
फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश