आयुष्याचं काय करायचं कळत नाही, 8300 कोटींची संपत्ती असलेल्या विनय हिरेमठ यांची पोस्ट चर्चेत
अमेरिकेतली हिंदुस्थानी वंशाचे उद्योगपती विनय हिरेमठ यांनी अवघ्या 33 व्या वर्षी त्यांचा स्टार्टअप बिझनेस विकून तब्बल 8300 कोटी कमावले आहेत. मात्र इतका पैसा कमावूनही त्यांना त्यांचे आयुष्य निरस वाटायला लागल्याने त्यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहले आहे. विनय हिरेमठ यांनी ट्विटरवर एक मोठी पोस्ट शेअर करत त्यांच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे, त्यांची मानसिक स्थिती सध्या कशी आहे याचा अनुभव त्यांच्या फॉलोअर्ससोबत शेअर केला आहे.
विनय हिरेमठ यांनी गेल्या वर्षी ते सहसंस्थापक असलेली लूम ही स्टार्टअप कंपनी तब्बल 975 मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल 8300 कोटींना विकली. मात्र आता इतकी गडगंज संपत्ती असून देखील आपण आयुष्यात काय करायचं कळत नाहीए, सगळं काही निरस वाटतंय अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. तसेच या गुंतागुंतीतून सुटण्यासाठी ते हिमालयात देखील गेले होते असे त्यांनी सांगितले.
”मी श्रीमंत आहे. पण आता या वळणावर मला आता माझ्या आयुष्याचं काय करायचं हे कळत नाहीए. गेल्या वर्षभरात आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या. माझी कंपनी विकल्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच काम करण्याची गरज नसल्याच्या अवस्थेत मी आलोय. सगळंकाही असूनही आयुष्य निरस वाटू लागलं आहे. पुन्हा पैसे कमावण्याची किंवा स्टेटस मिळवण्याची इच्छा उरलेली नाही. माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल मी फारसा आशादायी नाहीये. माझ्या या मानसिक स्थितीमुळे मी माझ्या प्रेयसीपासूनही वेगळा झालो. ते फार वेदनादायी होतं. जर ती ही पोस्ट वाचत असेल तर मला माफ कर मी तुला हवा तसा होऊ शकलो नाही, असे त्यांनी लिहले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List