पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ?

पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ?

>> प्रभाकर पवार

एकोणीसशे नव्वदच्या दशकात उल्हासनगरातील ‘एका शाळेत एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू असताना हरेश पटेल या गुंडाने आपल्या चार ते पाच साथीदारांना सोबत घेऊन वर्गात प्रवेश केला व रिंकू पाटील या विद्यार्थिनीला वर्गातील मुलांसमोर पेट्रोल ओतून जाळले. रिंकू एका क्षणात कापसासारखी जळाली. एकतर्फी प्रेमातून हरेश पटेल या माथेफिरूने हे भीषण कृत्य केले. या भयानक प्रकाराने सारा महाराष्ट्र व शिक्षण क्षेत्र हादरून गेले.

खून, अपहरण, दहशत आदी थरारक, अमानुष कृत्यांसाठी परिचित असलेल्या उल्हासनगरात एकेकाळी माणसांच्या अस्तित्वाला शून्य किंमत होती. तेथे रोज रक्ताचे सडे पडत होते. राजकीय पुढारी व त्यांच्या टोळ्यांनी लोकांना जगणे मुश्किल करून ठेवले होते. आमदार असलेल्या पप्पू कलानीची उल्हासनगरात प्रचंड दहशत होती. उल्हासनगर म्हणजे ‘कातिलों की बस्ती’ असे बोलले जायचे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीडच्या राजकीय पुढाऱ्यांच्या गुंड टोळ्यांचा, त्या चालविणाऱ्या आमदारांचा खरा खुनी चेहरा जनतेसमोर आल्याने बीडची ओळखही आता उल्हासनगरप्रमाणे ‘कातिलों की बस्ती’ अशी होऊ लागली आहे.

उल्हासनगरचा दहशतीच्या जोरावर निवडून आलेला आमदार पप्पू कलानी याला राजकीय वरदहस्तामुळे अनेक खून प्रकरणांतून वाचविण्यात आले. परंतु सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आमदार पप्पू कलानी याला जे. जे. हत्याकांड प्रकरणी ठोस पुरावे हाती लागल्यानंतर अटक करायचे आदेश दिले. पप्पू कलानी गजाआड झाला. एक-दीड दशके त्याने अरुण गवळीप्रमाणे जेलमध्येच काढली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ते ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ‘ला न्याय देतात की सत्ता टिकविण्यासाठी मित्रपक्षाच्या आमदारांना वाचविण्याचा, पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.

महाराष्ट्राचे एकेकाळचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांनी धाराशीवचे आपलेच चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली सुपारी देऊन नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या घालून हत्या केली. त्या वेळी पद्मसिंह पाटील यांनाही सुरुवातीला पाठीशी संतोष देशमुख यांचे अपहरण केले. ओळख पटू नये म्हणून त्यांनी ठेचून त्यांचा चेहरा विद्रूप केला व त्यांना ठार मारले. अशी राक्षसी वृत्ती, प्रजाती या भूतलावर सापडणार नाही. अशी क्रोधी दुर्गुणी माणसे जर राजकारण्यांकडे असतील तर का नाही आपल्या देशात अराजक, गुंडगिरी वाढणार?

बीडमध्ये दर महिन्याला सरासरी दोन-तीन जणांचे तरी मुडदे पाडले जातात. गेल्या चार- पाच वर्षांत राजकीय पुढाऱ्यांच्या इशारावरून घातले गेले, परंतु सीबीआयकडे न्यायालयाने तपास सोपविल्यानंतर पद्मसिंह पाटील या माजी गृहमंत्र्याला अटक झाली. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर ठोस निर्णय घेतला नाही तर ज्या आमदाराला सध्या पाठीशी घातले जात आहे तो आमदार उद्या तपास सीबीआयकडे गेला तर जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असे बोलले जाते. बीड जिल्हयाला ‘कातिलों की बस्ती’ बनविण्यात या आमदाराचा मोठा हात आहे. बीडमध्ये सध्या जे काही अराजक माजले आहे ते एका दिवसात माजलेले, वाढलेले नाही. राजकीय पाठबळ असल्याशिवाय टोळ्या तयार होत नाहीत. आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या कार्यकर्त्यांनी भय निर्माण केले नाही, कंपन्यांची कामे बंद पाडली नाहीत तर राजकीय पुढाऱ्यांना, प्रतिनिधींना कोण खंडणी देणार कोण इलेक्शन फंडिंग करणार प्रोटेक्शन मनी देण्यास विरोध करणाऱ्यांवर प्रथम हल्ले केले जातात. पवन ऊर्जा प्रकल्पातील एका सुरक्षा रक्षकाला वाल्मीक कराडच्या गुंडांनी खंडणीसाठी मारहाण केली तेव्हा सरपंच संतोष देशमुख त्याचा जाब विचारण्यासाठी जागेवर गेले परंतु 24 तास कमरेला दिसेल असे रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्या गुंडांनी प्रकरण शांत झाल्यावर बऱ्याच हत्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदारांच्या हस्तक्षेपामुळे, दबावामुळे पोलिसांनी कधी खऱ्या मारेकऱ्यांवर, सूत्रधारांवर कारवाई केलीच नाही उलट महिलेच्या वेषात असलेला एक पोलीस अधिकारी करुणा मुंडे यांच्या कारमध्ये परवाना नसलेले पिस्तूल गुपचूप ठेवून करुणा यांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून पोलीस काहीही करतात. त्यांच्या तालावर हवे तसे नाचतात. त्यामुळेच वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांनी बीड जिल्हयात अनेक गुन्हे केले व पचवले. परंतु संतोष देशमुख यांचा खून काही त्यांनी पचवता आला नाही. त्यामुळेच धनंजय मुंडेचा खासमखास प्रतिपालकमंत्री वाल्मीक कराड अडचणीत आला. डमी आरोपी पोलिसांसमोर सादर करून संतोष देशमुख प्रकरण थंड होईल असे वाल्मीक कराडला व त्याच्या ‘बॉस’ला वाटले होते. परंतु भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ते उधळून लावले. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. काही सत्ताधाऱ्यांना मॅनेज करून दाऊद इब्राहिमने अनेक खून पचवले तो अंडरवर्ल्ड डॉन झाला. त्याच्या पेरोलवर असलेल्या मुंबईतील काही पोलिसांनी त्याला मोठा केला.वाल्मीक कराडलाही बीड पोलिसांनीच मोठा केला. त्याचीच फळे आज सामान्य बीडवासी भोगत आहेत.

चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार झालेल्या अरुण गवळीचे काय झाले? आमदार झाल्यावर त्याच्या डोक्यात हवा गेली. त्याच्या वतीने व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोन जाऊ लागले. परंतु अवाच्या सवा मागणी करणाऱ्या अरुण गवळीविरुद्ध काही व्यावसायिकांनी तक्रारी केल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेः परंतु गवळीच्या महागड्या वकिलांनी गवळीला अटक होऊ दिली नाही. अटकपूर्व जामिनावर सुटलेला अरुण गवळी आता तरी शांत बसेल असे अनेकांना वाटत होतेः परंतु गप्प बसेल तो गवळी कसला? त्याने नवी मुंबईतील एका बिल्डरकडून सुपारी घेऊन 2006 साली घाटकोपरच्या असल्फा येथे शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या घडवून आणली. या वेळीही अरुण गवळीने साकीनाका पोलिसांना मॅनेज करून ‘डमी’ आरोपी सादर केले. हे सरकारच्या लक्षात आल्यावर जामसंडेकर हत्येचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपविण्यात आला. त्या वेळी राकेश मारिया हे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त तर देवेन भारती अतिरिक्त आयुक्त होते. या दोन अधिकाऱ्यांनी कसून तपास केला व अरुण गवळीने सुपारी घेऊन जामसंडेकर यांची कशी हत्या केली याचे पुरावे न्यायालयात सादर केले. कोर्टाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अरुण गवळी गेल्या दहा वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्याच्या अगोदरच्या बहुसंख्य केसेसमधून तो निर्दोष सुटला होताः परंतु पैशाचा, खंडणीचा मोह किंवा त्याची पापे त्याच्या मुळावर आली. वाल्मीक कराड व त्याच्या बॉसचीही तीच गत होणार आहे. पाप फार काळ लपत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाकले तर पुढील काळ त्यांनाही माफ करणार नाही.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह अर्धा डझन आरोपीना अटक केली. परंतु प्रमुख सूत्रधार कुठे आहेत? जेव्हा आमदार पप्पू कलानी जेलमध्ये गेला तेव्हा उल्हासनगरमध्ये शांतता पसरली. मग बीड कधी शांत होणार? बीडची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे जोपर्यंत जेलमध्ये जाणार नाहीत, तोपर्यंत बीड शांत होणार नाही.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयफोन यूजर्ससाठी मोठी अपडेट, आता ‘या” प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही आयफोन यूजर्ससाठी मोठी अपडेट, आता ‘या” प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही
तुम्हीही Apple iPhone वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. कंपनीने आयफोन युजर्ससाठी iOS 18.2.1 अपडेट जारी केले आहे....
बांगलादेशने शेख हसीना यांचा पासपोर्ट केला रद्द, हिंदुस्थानने व्हिसाची मुदत वाढवली
Tirupati Temple Stampede तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू
सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री
चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही भंगार लोक जवळ पाळून उभ्या जातीला डाग लागून घेतला, मनोज जरांगे जोरदार टीका
8 लग्न,13 वर्ष बॉक्स ऑफिसवर राज्य; सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचे खासगी आयुष्य फारच चर्चेत