‘रामायण’मधल्या उर्मिलाचा मॉडर्न अंदाज; 38 वर्षांनंतर बदलला इतका लूक, ओळखणंही कठीण
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली व्यास तुम्हाला आठवतेय का? स्क्रीनवर पौराणिक कथेतील भूमिका साकारणारी अंजली खऱ्या आयुष्यात मात्र खूप मॉडर्न आहे.
याच मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांनी त्यांची ऑनस्क्रीन पत्नी उर्मिलाचा मॉडर्न अंदाज नेटकऱ्यांना दाखवला. सुनील यांनी सोशल मीडियावर अंजली यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये अंजली 'पुष्पा 2'मधील गाजलेल्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत सुनील यांनी म्हटलंय, "2025 मध्ये मी तुम्हाला नवी, मॉडर्न आणि नव्या रुपातली म्हणजेच ऑस्ट्रेलियन लूकमधली अंजली दाखवतो. तुम्ही 2024 मध्येही तिला भेटला आहात."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List