अल्लू अर्जुनच्या अटकेचा ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्याला मोठा धक्का; घेतला आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय
अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं भल्या -भल्या चित्रपटाच्या कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबास्टर ठरला. मात्र हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अल्लू अर्जुनला झालेली अटक. ‘पुष्पा 2’ चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी हैदराबादच्या संध्या थिअरटमध्ये अचानक अल्लू अर्जुन पोहोचला. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. एकच गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.मात्र त्याच दिवशी अल्लू अर्जुला जामीन देखील मिळाला. परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्याला ती रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. त्यानंतर देखील अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2’ चित्रपट निर्मात्याच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. काँग्रेस नेत्यानं केलेल्या तक्रारीनंतर अडचणी अजून वाढल्या आहेत.
‘पुष्पा 2’च्या रिलीजनंतर सुरू झालेल्या या घडामोडींचा चित्रपटाचे निर्माते सुकुमार यांनी चांगलाच धसका घेतला आहे. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्र सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘पुष्पा 2’ चे निर्माते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते, तेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला सोडायची आहे. तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिलं चित्रपट त्यांच्या या उत्तरामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान अल्लू अर्जुनने देखील त्या ज्या पद्धतीनं अटक करण्यात आली होती, त्यावरून नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी त्याच्या बेडरूममध्ये घुसून त्याला अटक केल्याचा दावा त्यानं केला होता, पोलिसांनी आपल्याला कपडे देखील घालू दिले नाही, नाष्ता देखील करू दिला नाही असा आरोपही अभिनेत्याकडून पोलिसांवर त्यावेळी करण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List