अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते, भाजपच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या; संजय राऊत यांचा घणाघात
भाजपने मला, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं तेव्हा अजित पवार काही बोलले का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर नाही असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, धनंजय मुंडेंविरोधात पुरावे मिळाल्यानंतरही अजित पवारांना आणखी कुठले पुरावे हवेत? भारतीय संविधानात इंडियन एव्हिडन्स कायदा आहे तो बदलला का? हे अजित पवारांनी सांगावं. अजित पवार हतबल आहेत. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते महाराष्ट्राचे नेते असते तर बीडमधील मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं जोपर्यंत न्यायालय निर्दोष मानत नाही असे संजय राऊत म्हणाले.
तसेच भाजप सरकारने आम्हाला पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं. तेव्हा अजित पवार बोलले नाही की यांच्याविरोधात पुरावे नाहीत. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याबाबात पुरावे नव्हते, तेव्हा अजित पवार काही बोलले नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List