महिलांना प्रेग्नंट करा आणि 5 लाख रुपये मिळवा! ऑफर दिली अन् तुरुंगात रवानगी झाली
मुलबाळ नसलेल्या महिलेला गर्भवती बनवा आणि लाखो रुपये कमवा… अशी जाहिरात सध्या बिहारच्या नवादा परिसरात व्हायरल होतेय. त्यामुळे अनेक लोकांनी या नंबरवर संपर्क साधला. जर महिलेला गर्भधारणा झाली तर त्या व्यक्तीला तब्बल 5 लाख रुपये दिले जातील. असे फोनवर सांगण्यात आले. मात्र, ते पैसे काही मिळालेच नाही. यानंतर लोकांच्या तक्रारीवरून ही खोटी जाहिरात पसरवणाऱ्या 3 सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सायबर क्राईमचे जाळे देशातभरात पसरले आहे. आजपर्यंत लाखो लोक या फसवणुकीला बळी पडले आहेत. बिहारमध्येही अशीच एक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये मूल नसलेल्या महिलांना गर्भवती करण्यासाठी 5 लाख देण्याच्या जाहिराती येत होत्या. पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी लोक हे काम करण्यास तयार झाले. लोकांनी जाहिरातदारांना संपर्क करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरला. या फॉर्मसाठी त्यांनी पैसेही दिले. मात्र, पैसे भरल्यानंतर हे सायबर चोरटे संबंधित लोकांना ब्लॉक करायचे. या सायबर चोरट्यांनी अनेकांकडून अशा पद्धतीने पैसे घेतले होते.
सायबर क्राईमच्या कचाट्यात सापडल्याचे कळताच लोकांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीवरून या चोरट्यांचा शोध घेण्यात सुरुवात केली. चौकशीदरम्यान, पोलिसांनी नारदीगंज पोलीस हद्दीतील कहुआरा गावात छापेमरी करुन 3 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडलेले हे चोरटे लोकांना ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब, प्ले बॉय सर्विसच्या नावावर लोकांची फसवणूक करत होते. राहुल कुमार (19), भोला कुमार (20) और प्रिंस राज उर्फ पंकज कुमार (20) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून 6 अँड्रॉईड फोन जप्त केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List