Orry : ओरीचं नशीब चमकलं ! रणबीर कपूरच्या ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू

Orry : ओरीचं नशीब चमकलं ! रणबीर कपूरच्या ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू

बॉलिवूडसाठी पुढचं वर्ष कास असून अनेक मोठ्या चित्रपटांची कामं सुरू होणार आहेत, तर काही चित्रपट पुढल्या वर्षी रिलीजाठी तय्यार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विख्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या ‘लव्ह अँड वॉर’ (Love And War) हा चित्रपट. रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट खूप चर्चेत असून त्या तिघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं असून लवकरच त्याची रिलीज डेटही समोर येईल. याच दरम्यान या चित्रपटासंदर्भात दोन महत्वाच्या अपडेट्सही समोर आल्या आहेत.

त्यातील पहिली म्हणजे आलिया, रणबीर आणि विकी कौशल यांच्या या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडूकोण हिचाही कॅमिओ असणार आहे. हा रोमँटिक पीरियड वॉर चित्रपट संजय लीला भन्साळी मोठ्या स्तरावर बनवत असून 2026 मध्ये तो रिलीज होण्याची शक्यता आहे. नुकतीच आई झालेल्या दीपिकाचाही या चित्रपटात एक छोटासा रोल असेल असे वृत्त आहे. आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे सोशल मीडियावर यत्र तत्र सर्वत्र अर्थात सगळ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये, सेलिब्रिटींसोबत खास पोझ देणारा ओरहान अवात्रामणि अर्थात ओरी हा देखील या चित्रपटात काम करत असून त्याद्वारे तो बॉलिवूडमध्ये डेब्यूही करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry)

रणबीर-विकीसोबत दिसणार दीपिका ?

नुकतेच या चित्रपटाबाबत अनेक मोठे अपडेट्स समोर आले आहेत. त्यानुसार विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दीपिका पदुकोणचा कॅमिओ दिसणार आहे. पण सध्या तरी तिच्या भूमिकेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. आणि सोल मीडिया सेन्सेशन असणारा ओरी हा या चित्रपटात होमोसेक्सुअल व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया या चित्रपटात एक डान्सर म्हणून दिसणार असून विकी कौशल आणि रणबीर हे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

खरंतर दीपिका पडूकोण आणि ओरीच्या भूमिकेबद्दल मेकर्सनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी ते दोघं या चित्रपटात दिसले तर त्यांच्या चाहत्यांसाठी याहून आनंदाची दुसरी बाब नसेल. संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ‘गोलियों की रासलीला रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’, त्यांचे हे तिन्ही चित्रपट अतिशय हिट ठरले होते, बॉक्स ऑफीसवरही या चित्रपटांनी चांगला गल्ला कमावला होता. तर रणीबीर कपूर हा सांवरिया नंतर पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. गंगूबाी चित्रपटाच्या यशानंतर आलियादेखील संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. विकी कौशल मात्र त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले