पालघरचा चेहरामोहरा बदलणार, बंदरापाठोपाठ आता वाढवणमध्ये नवीन विमानतळ

पालघरचा चेहरामोहरा बदलणार, बंदरापाठोपाठ आता वाढवणमध्ये नवीन विमानतळ

वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. जगातील सर्वात मोठय़ा दहा बंदरापैकी एक हे वाढवण बंदर असेल. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे.या भागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार असून याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे. यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत राज्यातील सर्क विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा घेतला. राज्यातील अकरा विमानतळांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. प्रशिक्षण विमान – अमरावतीत एअर इंडियाची फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार. ही आशियातील सर्वात मोठी अकादमी असणार आहे. राज्यातील ज्या विमानतळाकर रात्री विमान उतरण्याची सुविधा आहे. पण तेथेही काही अडचणी आहेत. काही विमानतळांचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. उशीर का होत याचे कारणे शोधून लवकरात लवकर मार्ग काढून कामे पूर्ण करावीत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असून नवी मुंबई विमानतळाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट क्षमता असेल असे यावेळी सांगण्यात आले.

पालघर विमानतळ प्रक्रिया

याकेळी बोलताना देवेंद्र फडणकीस म्हणाले की, सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल असे नियोजन करा. शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न 31 मार्चपर्यंत सोडका. जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले