गेल्या दोन वर्षांत आसाममध्ये 21 दहशतवाद्यांना अटक, कोट्यवधी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
आसाममध्ये 2024 साली 21 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर कोट्यवधी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यातल आले आहे. आसामच्या स्पेशल टास्क फोर्सने ही कामगिरी बजावली आहे.
आसाम एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 21 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात इसिस, उल्फा आणि माओवाद्यांचा समावेश आहे. अंमली पदार्थाच्या मोहिमेविरोधात एसटीएफने 59.414 किले हिरोईन, 9 लाख 67 हजार 898 सायकोट्रॉपिक गोळ्या, बॅन केलेल्या कफ सिरपच्या 37 हजार बाटल्या, 4 हजार किलो गांजा आणि 37.26 किलो अफू तर एक किलो मेटाफेटामिनही जप्त करण्यात आले आहे.
एसटीएफने चार रायफल, 7.65 मीमीचे एक पिस्तूल, एके 47 च्या गोळ्या, ग्रेनेट आणि आईडी बनवण्याचे सामानही जप्त केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List