भूकंपाच्या धक्क्याने तिबेटमध्ये प्रचंड नुकसान, 50 हून अधिक मृत्यू; हिंदुस्थान, नेपाळमध्येही जाणवले हादारे
तिबेट आणि नेपळामध्ये मंगळवारचा सूर्य भूकंपाच्या धक्क्यांनी उगवला. या भूकंपाचे हादरे हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या अनेक भागांमध्येही जाणवले. या रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी नोंदवली गेली. भूकंपात 53 जणांचा मृत्यू झाल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
नेपाळ सीमेला लागून असलेल्या शिजांग या पहाडी भागात मंगळवारी सकाळी एकामागून एक असे 6 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. भूकंपाने तिबेटमधील शिगात्से शहरात मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरं, इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था सिन्हुआने या भूकंपाबाबत माहिती दिली आहे. तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात 53 जणांचा मृत्यू झाला तर 62 जण जखमी झाले, चीनने म्हटले आहे. हिंदुस्थान, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागांना या भूकंपाचे हादरे बसले. हिंदुस्थानात सिक्किमसह ईशान्येतील इतर राज्ये, बिहार, पश्चिम बंगालससह उत्तर हिंदुस्थानात अनेक भाग भूकंपाने हादरले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List