माथेरानमध्ये हिट ॲण्ड रन, दारुड्या कारचालकाने घोड्याला उडवले, चार गाड्यांना धडक
माथेरानमध्ये आलेल्या एका माथेफिरू वाहनचालकाने घोड्याला उडवले आणि चार गाड्यांना जोरदार धडक देत तो पसार झाला. पळून जाताना त्याने दस्तुरी नाका येथे स्थानिकांच्या अंगावर गाडी घातली. परंतु ते वेळीच बाजूला झाल्याने मोठी जीवितहानी टळली. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. वनखात्याचे कर्मचारी, पोलीस आणि नागरिकांनी त्याचा शोध घेऊन माथेरान-नेरळ रस्त्यावरून त्याला पकडले. मोहनेश शितूरकर (23) असे त्याचे नाव असून तो मुलुंड येथील रहिवाशी आहे.
मुंबई महापालिकेचे मुलुंड येथील मोहनेश शितूरकर हा विकेंड साजरा करण्यासाठी माथेरान सेवानिवृत्त अधिकारी सुनील डोईफोडे यांच्या कारवर तो वाहनचालक म्हणून काम करत होता. सुनील डोईफोडे यांच्या कुटुंबीयांना माथेरानला सोडून परतीच्या प्रवासात त्याने दारू ढोसली आणि गाडी पार्किंगमधून काढत असताना जवळच उभ्या असलेल्या एका घोड्याला उडवले. त्यानंतर पार्किंगमधील चार वाहनांना एकापाठोपाठ एक धडक देत गाड्यांचे मोठे नुकसान केले. तेथू तो नेरळच्या दिशेने गाडी घेऊन पळाला.
दस्तुरी नाका येथेही त्याने स्थानिक वाहनचालकाच्या दिशेने गाडी जोरात नेली. परंतु सावधगिरी म्हणून ते सर्व बाजूला झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तेथून पळून जाऊन घाट उतरताना मोहनेश शितूरकर याने रस्त्याच्या रेगिंगलाही कार जोरात घासली. त्यामुळे कारचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. टायरही फुटला, मॅग्व्हीलही तुटले आणि गाडी 90 अंशाच्या कोनात पुन्हा माथेरानच्या दिशेने गोल फिरली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List