व्हॉट्सअॅप जुनी ऑपरेटिंग सिस्टम बंद करणार
व्हॉट्सअॅप आपली जुनी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच अँड्रॉईडच्या किटकॅट व्हर्जनवर चालणाऱ्या व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे दहा वर्षे जुन्या असलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअॅप सेवा 1 जानेवारी 2025 पासून बंद केली जाणार आहे. मेटाच्या मालकीची असलेली व्हॉट्सऍप कंपनी दरवर्षी एक व्हर्जन बंद करते. कंपनीच्या या निर्णयानंतर सॅमसंग गॅलेक्सी एस3, गॅलेक्सी नोट2, गॅलेक्सी एच3, गॅलेक्सी एस3 मिनी, मोटो जी, रेजर एचडी, मोटो ई 2014, सोनी कंपनीचे मोबाईल एक्सपेरिया झेड, एक्सपेरिया एसपी, एक्सपेरिया टी, एक्सपेरिया व्ही, एलजी कंपनीचे मोबाईल ऑप्टिमस जी, नेक्सस 4, जी 2 मिनी, एल 90 या फोनवर व्हॉट्सऍप चालणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List