प्रेयसीला फ्लॅट, बीएमडब्ल्यूची दुचाकी, तर पतीला एसयूव्ही कार! क्रीडा विभागात 21 कोटींच्या अपहारातून कंत्राटीने लावली विल्हेवाट

प्रेयसीला फ्लॅट, बीएमडब्ल्यूची दुचाकी, तर पतीला एसयूव्ही कार! क्रीडा विभागात 21 कोटींच्या अपहारातून कंत्राटीने लावली विल्हेवाट

विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्याला नेट बँकिंग सुविधेच्या आधारे साडेएकवीस कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीने प्रेयसीला फोर बीएचके फ्लॅट, बीएमडब्ल्यू दुचाकी, कार तर लेखा लिपिक महिलेने पतीच्या नावे एसयूव्ही कार खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. यातील आरोपी संगणक ऑपरेटर हर्षकुमार क्षीरसागर याचे दोन, तर लेखा लिपिक यशोदा शेट्टी व पती जीवन याचे प्रत्येकी एक असे एकूण चार बँक खाते सील केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

क्रीडा विभागातील अपहाराचा मुख्य आरोपी कंत्राटी संगणक ऑपरेटर हर्षकुमार अनिल क्षीरसागर (21, रा. बीड बायपास, सातारा) याने अपहार केलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही 18 ते 20 खात्यांवर वळती केली आहे. त्याने अपहार केलेल्या रकमेपैकी आतापर्यंत त्याच्या खात्यावर जवळपास 3 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या खात्यावरून वळती झालेल्या रकमेचा तपास सुरू केला आहे. या तपासात त्याने या अपहार केलेल्या रकमेतून पुण्याहून तब्बल ३२ लाखांची बीएमडब्ल्यू दुचाकी, एक बीएमडब्ल्यू कार आणि एसयूव्ही कार खरेदी केली होती. त्यातही एसयूव्ही कार ही यशोदा शेट्टी हिचा पती जीवन याच्या नावे खरेदी केल्याचे समोर आले आहे. ही कार हर्षकुमार स्वतः वापरत होता. तसेच आरोपी हर्षने प्रेयसीच्या नावे चिकलठाणा विमानतळसमोरील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘माय वर्ल्ड’ या इमारत समूहाच्या डी विंगमध्ये फोर बीएचके फ्लॅट घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच त्याने शहरातील एका नामांकित ज्वेलर्सकडे युनिक आर्टीकलसाठी मोठी रक्कम जमा केली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लेखा लिपिक यशोदा जयराम शेट्टी (38) आणि तिचा पती जिवन कार्यप्पा विंजडा उर्फ बी. के. जीवन (47, दोघे रा. गादिया विहार) या दोघांना अटक केली होती. त्यांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले होते. त्यांना 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल. रामटेके यांनी दिले. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

…आणि यशोदा कोर्टात ढसाढसा रडली

पोलिसांनी अटक करून आरोपी यशोदा आणि तिचा पती जीवन या दोघांना न्यायालयात आज सोमवारी हजर केले. युक्तिवाद सुरु असताना यशोदाच्या वकिलाने यशोदाला चार मुले असून ती लहान असल्याचे सांगताच यशोदाने न्यायालयातच ढसाढसा रडण्यास सुरवात केली. तसेच यशोदा हिच्या खात्यावर आलेले अडीच लाख रुपये तिने हातउसने घेतल्याचे वकिलाने न्यायालयात सांगितले. हा मुद्दा खोडून काढत सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी आरोपी हर्षकुमार आणि यशोदाकडे पत्रव्यवहार करणे, कॅशबुकमध्ये नोंदी घेणे, पावती बुक लिहणे, बँकेशी पत्रव्यवहार करणे, बँक खात्याचे स्टेटमेंट मागविणे व त्याचे रेकॉर्ड ठेवणे आदी कामे सोपविण्यात आली होती. त्यामुळे गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दोघा आरोपींचे घरगुती संबंध असल्याने 1 कोटी 67 लाख रुपये हर्षने आरोपी जीवनच्या खात्यावर वळती केल्याचे देखील अवसरमोल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन वरिष्ठ लिपिकांची चौकशी

या घोटाळा प्रकरणात पोलिसांनी क्रीडा अधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ लिपिकांची चौकशी केली. कंत्राटी कर्मचारी घोटाळा करत असताना कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खबर कशी लागली नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट 40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट
लाडक्या बहिणींना कमळाबाईने न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेला आहे, तर काही भाज्या 30 ते...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी यांचे निधन
राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर बंदी घाला, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
‘शक्ती’ कायद्याची फाईल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, शिवसेनेच्या मागणीला यश
पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या चमकोगिरीच्या ‘चॅनल’ बैठका
फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश