रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ

मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्यात आज सामंजस्य करार झाला.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, मुंबईची ओळख अविरत कार्य करणाऱयांचे महानगर अशी आहे. मुंबईतील खाद्यपदार्थ विव्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, ताजे अन्न पुरवावे यासाठी परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त सभागृहात झालेल्या सामंजस्य करारावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव, पश्चिम विभागाच्या संचालक प्रीती चौधरी, सहसंचालक डॉ. के. यू. मेथेकर यांच्यासह उपायुक्त संजोग कबरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी उपस्थित होते.

असे दिले जाईल प्रशिक्षण

  • प्रशिक्षणासाठी पालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन केली जाईल. त्यात महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे प्रत्येकी तीन सदस्य असतील.
  • समन्वय समितीमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रशासकीय कामकाज, देखरेख, अंमलबजावणी व पुनरावलोकन करण्याची जबाबदारी असेल.
  • प्रशिक्षण अंमलबजावणीच्या यशासाठी एक मानांकन ठरवण्यात येईल व त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत …अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत
माजी क्रिकेट विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे, त्याला उपचारासाठी भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या विनोद...
“आम्हाला नेहमी सन्मानाने वागवलं”, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना कलाकार भावूक ; अनेकांनी केल्या भावना व्यक्त
होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क…
वायू प्रदूषणाचा प्रकोप… अर्ध्या देशाला नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासले; रिपोर्टमधील दावा चिंताजनक
सुप्रसिद्ध आयफेल टॉवरला आग, 1200 लोकांची सुटका
राज्यात बदल्यांचे सत्र सुरूच, 12 सनदी अधिकाऱ्यांची बदली
Jammu Kashmir – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; चार जण जखमी