कॅन्सर शरिरात पसरला,जगण्याची शक्यता फक्त 30 टक्के… सोनाली बेंद्रेचा अंगावर शहारा आणणारा अनुभव

कॅन्सर शरिरात पसरला,जगण्याची शक्यता फक्त 30 टक्के… सोनाली बेंद्रेचा अंगावर शहारा आणणारा अनुभव

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही ती अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. सोनालीने नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. सोनालीने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ पाहिला तो म्हणजे तिला झालेलं कॅन्सरचे निदान. याबदद्लचा एक भयानक किस्सा तिने सांगितला होता.

काही वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेला कर्करोगाचे निदान झालेले. ते दिवस तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी फारच अवघड होते. तिने जेव्हा ही गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला होता 

एका मुलाखतीत सोनाली बेंद्रेने त्यावेळेसची परिस्थीती काय होती याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “जेव्हा हे घडले, तेव्हा मी एक रिॲलिटी शो करत होते. आम्ही दर आठवड्याला शूटिंग करत होतो. मला जाणवत होते की माझ्या आत काहीतरी चुकीचं घडतंय. मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा आम्हाला कळले की मला कॅन्सर झाला आहे. सुरुवातीला मला वाटले की फर्स्ट स्टेज असेल पण चाचण्या केल्या असता मला कळले की तो पूर्णपणे माझ्या शरीरात पसरलाय. ही परिस्थिती पाहून माझे डॉक्टर आणि माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला.”

कॅन्सर झाला हे मान्य होत नव्हतं

2018 मध्ये जेव्हा सोनालीच्या कॅन्सरचे निदान झाले तेव्हा डॉक्टरांनी तिची जगण्याची केवळ 30 टक्केच शक्यता दिली होती. त्यावेळी तिच्यासह तिच्या घरच्यांनाही धक्का बसला होता.

सोनालीने पुढे सांगितले की, “मला कॅन्सर झाला आहे हे मी स्वीकारण्यास नकार दिला. मी घरी जाऊन झोपले, पण जेव्हा मला जाग आली तेव्हा काहीही बदलले नव्हते. माझ्या पतीने ताबडतोब निर्णय घेतला आणि दोन दिवसांतच आम्ही परदेशात गेलो. मी त्याच्याशी भांडत होते कारण माझा मुलगा रणवीर समर कॅम्पसाठी बाहेर गेला होता. मी त्याला म्हणाले होते जरा थांब, मला थोडा वेळ दे. तेव्हा तो म्हणाला की बाकी गोष्टींकडे लक्ष देणं बंद कर, स्वत:कडे लक्ष दे,कारण तुला जीवंत राहायचं आहे”. हे सांगताना सोनाली भावूकही झाली.


डॉक्टरांनी जगण्याची शक्यता 30 % दिली होती

ती पुढे म्हणाली “मी माझी कॅन्सरची लढाई सुरू केली जेव्हा माझी जगण्याची शक्यता 30 टक्केच होती. मी माझ्या डॉक्टरांशी सतत भांडायचे की ते असे कसे करु शकतात. पण नंतर मला कळले की ते फक्त सत्य बोलत होते.” असं म्हणत तिने त्यावेळची तिची मनस्थिती काय होती हे सांगितले.

सोनाली बेंद्रेवर वेळीत आणि योग्य उपचार झाल्यामुळे ती आजारातून बरी झाली आहे. तिने आपल्या कामाला ही सुरुवात केली आहे. तसेच आता जरी ती सिनेमे करत नसली तरी वेगवेगळ्या रिअलिटी शोमधून की प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आताही तिला प्रेक्षकांचे तेवढेच प्रेम मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स...
पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख
मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक
मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या
मुंबई विमानतळावर गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; बँकॉकहून आलेल्या केरळच्या प्रवाशाला अटक