ममता कुलकर्णीने गँगस्टर विकी गोस्वामीशी खरंच लग्न केलं होतं का? स्वत:च केला खुलासा

ममता कुलकर्णीने गँगस्टर विकी गोस्वामीशी खरंच लग्न केलं होतं का? स्वत:च केला खुलासा

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी सतत चर्चेत असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईत परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर तिने काही मुलाखती दिल्या असून त्यात तिच्या आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा इंडस्ट्रीत काम करणार का, या प्रश्नाचंही तिने उत्तर दिलं आहे. “मी बॉलिवूडसाठी परत आले नाही आणि पुन्हा अभिनेत्री म्हणून कमबॅक करण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही”, असं ममताने स्पष्ट केलंय. ड्रग्ज प्रकरणातही ममताचं नाव समोर आलं होतं. मात्र ड्रग्जशी माझा कोणताच संबंध नाही, असं तिने या मुलाखतीत म्हटलंय.

विकी गोस्वामीशी कनेक्शन

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममता म्हणाली, “माझं ड्रग्ज विश्वाशी काहीच कनेक्शन नाही कारण मी त्या लोकांना कधी भेटलेच नाही. होय, विकी गोस्वामीशी माझा संपर्क झाला होता. 1996 मध्ये माझा अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि त्यादरम्यान माझ्या आयुष्यात एक गुरू आले. विकी जेव्हा दुबईत होता, तेव्हा त्याने मला फोन करून भेटायला बोलावलं होतं. जेव्हा मी त्याला भेटले… त्यानंतर मी स्वत:ला 12 वर्षे ध्यान, तप आणि पूजा पाठ यातच मग्न करून घेतलं. जेव्हा 2012 मध्ये तो जेलमधून बाहेर आला, तेव्हा माझ्या सर्व इच्छा-आकांक्षा संपल्या होत्या. मग प्रेमात पडणं किंवा लग्न करणं या गोष्टी शिल्लकच राहिल्या नव्हत्या. तो जेलमधून बाहेर आला आणि जोपर्यंत तो जेलमधून बाहेर येत नाही तोपर्यंत मी भारतात परत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो केन्याला गेला आणि मी भारतात कुंभ मेळ्यासाठी आले होते. 2012-13 ची ही गोष्ट आहे. मी दुबईतून थेट अलाहाबादला (आता प्रयागराज) दहा दिवसांसाठी गेले होते आणि तिथून पुन्हा दुबईला गेले.”

आठ वर्षांपासून संपर्क नाही?

2017 मध्ये ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या दोघांचं नाव समोर आलं होतं आणि त्याआधारे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. जानेवारीमध्ये गोस्वामी, इब्राहिम आणि बकताश आकाशा तसंच गुलाम हुसैन यांना केन्यातून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. या सर्वांना नोव्हेंबर 2014 मध्ये युएस ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीच्या (DEA) स्टिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आली होती.

“विकी केन्याला परत गेला आणि एकदा किंवा दोनदा मी त्याला भेटायला गेले होते. नंतर मी दुबईला परतले. तो केन्यामध्ये आधीच आरोपी ठरला होता आणि त्यावेळी मी त्याच्यासोबत नव्हते. 2016 ते 2024 पर्यंत मी स्वत:साठी तपस्या केली. मी आता त्याच्या संपर्कात नाही. 2016 मध्येच आमचा संपर्क तुटला”, असं ममता कुलकर्णीने स्पष्ट केलं.

भारतात परतल्यानंतर ममताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला होता. “मी 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. 2000 पासून मी भारताबाहेर राहतेय. हा संपूर्ण प्रवास खूपच भावूक होता आणि आता 2024 मध्ये मी पुन्हा मायदेशी परतली आहे. मला खूप आनंद होत आहे. हा आनंद मला शब्दांत मांडता येत नाहीये,” असं ती या व्हिडीओत म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…