अन्यथा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडमधून दुसरीकडे हलवावा लागेल, आमदार धस यांनी वर्तवली भिती
बीड प्रकरणी मी धनंजय मुंडे यांचा राजीनाम मागितला नाही असे स्पष्टीकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी दिले आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात यावे अशी मागणी धस यांनी केली, अन्याथा हा खटलाच इतर जिल्ह्यात हलवावा लागेल अशी भितीही धस यांनी व्यक्त केली.
आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धस म्हणाले की, बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. फडणवीस यांनी निकम यांच्याशी चर्चा केल्याचेही धस यांनी सांगितले आहे.
देशमुख हत्येप्रकरणी सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. पण त्यातील प्रमुख अधिकारी सोडले तर काही कर्मचाऱ्यांबद्दल आक्षेप आहे. ही बाब मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्या कर्मचाऱ्यांबद्दल आक्षेप आहे त्यांच्याबद्दल लेखी निवेदन द्या त्यांना हटवले जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी मागितला नाहिये असे धस म्हणाले.
तसेच आका मोठ्या आकांसोबत सगळीकडे होते. अजित पवारांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार. तीच गाडी पोलिसांना स्वाधीन करताना वापरली गेली. तीच गाडी केज पोलीस ठाण्यात भेटायला जाताना वापरली गेली. हा खटला बीडमध्ये चालवावं, पण बीडमधील पोलीस ठाण्यात या आरोपींना ठेवू नये. या आरोपींना संभाजीनगरच्या हरसूलला हलवावेत किंवा नाशिकच्या तुरुंगात हलवावेत. बीडमध्ये एकाच वर्गातले अधिकारी आलेले आहेत, त्यामुळे बीडमध्ये समस्या निर्माण होऊ शकतो. आता मी फक्त आरोपींना तिथून हलवण्याची मागणी करत आहे, भविष्यात ही केसही बीडमधून हलवण्याची वेळ येऊ शकते असेही धस म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List