Khel Ratna Award 2025 – डी. गुकेश, मनू भाकरसह चार खेळाडूंना खेलरत्न, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर
बुद्धिबळाच्या पटावर अव्वल ठरलेल्या डोम्माराजू गुकेशला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच बरोबर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक पटकावत इतिहास रचणाऱ्या मनू भाकरचेही नाव खेलरत्न पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आले आहे. यांच्या व्यतिरिक्त टीम इंडियाचा स्टार हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्रीडा मंत्रालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 32 खेळाडूंना अर्जून पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाध्ये सन्मानित करण्यात येईल. क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List