दोन फायर स्टेशन, 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे; कोस्टल रोड मुंबईला देणार जलद अग्निसुरक्षा! आगीच्या ठिकाणी बचाव पथक वेगाने पोहोचणार

दोन फायर स्टेशन, 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे; कोस्टल रोड मुंबईला देणार जलद अग्निसुरक्षा! आगीच्या ठिकाणी बचाव पथक वेगाने पोहोचणार

मुंबईत कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास वेगाने पोहोचता यावे यासाठी आता कोस्टल रोडवर दोन अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन उभारली जाणार आहेत. यामुळे दुर्घटनेमध्ये होणारी जीवित-वित्तहानी कमी होण्यास मदत होणार असून मुंबईची अग्निसुरक्षा वाढणार आहे. शिवाय अपघात टाळण्यासाठी 70 ठिकाणी स्पीड कॅमेरेही बसवण्यात येणार असल्याने अपघातांना आळा बसणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक असा एकूण 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या कोस्टल रोडमुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 9 ते 10 मिनिटांत होणार असून वेळेची 70 टक्के तर इंधनाची 34 टक्के बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका 14 हजार कोटींचा खर्च करीत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात 175 एकर मोकळी जागाही उपलब्ध होणार आहे. या जागेचा वापर पालिका उद्यान, पार्किंग आदी नागरी सुविधा तयार करणार आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दोन फायर स्टेशनही उभारली जाणार आहे. यासाठी पालिकेने जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. फायर स्टेशन उभारण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

वेगमर्यादा मोडल्यास कारवाई

  • कोस्टल रोडवर स्कूटर, टू व्हिलरना बंदी आहे. मात्र अनेक वेळा काही अतिउत्साही तरुण या ठिकाणी मध्यरात्री धूम स्टाईल बाइक पळवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनीदेखील तक्रारी केल्या आहेत.
  • शिवाय काही स्विगी, झोमॅटोसारख्या कंपन्यांच्या बाइकही मार्गावरून जात असल्याचे समोर आले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालिका इंट्री पॉइंटवर आपले मनुष्यबळ तैनात करणार असून पोलिसांचीही या कामासाठी मदत घेण्यात येणार आहे.
  • कोस्टल रोडवरील टनेलमध्ये ताशी 60 किमी आणि मोकळय़ा मार्गावर ताशी 80 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे. स्पीड पॅमऱयामुळे हा नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मरीन ड्राइव्हपासून दहिसरपर्यंत सुरक्षा

मुंबईत प्रत्येक मार्गावर दिवसरात्र वाहतूककोंडी असल्यामुळे काही वेळा आगीसारख्या दुर्घटनेच्या ठिकाणी पाहोचण्यास उशीर होतो. यामुळे आगीची तीव्रता वाढून जीवित-वित्तहानी वाढण्याची भीती असते. मात्र प्रिन्सेस स्ट्रीट-मरीन ड्राइव्ह येथे सुरू झालेला कोस्टल रोड आगामी काळात थेट दहिसर-भाईंदरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी इंटरचेंज असल्यामुळे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुंबईत कुठल्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास कोस्टल रोडवरून अग्निशमन दलाला बचावकार्याच्या सामग्रीसह दुर्घटनास्थळी जलदगतीने पोहोचण्यास मदत होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स...
पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख
मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक
मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या
मुंबई विमानतळावर गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; बँकॉकहून आलेल्या केरळच्या प्रवाशाला अटक