17 दिवस उलटले तरी 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, लाड खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीस संतापले

17 दिवस उलटले तरी 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, लाड खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीस संतापले

महायुती सरकारमधील नाराजी काही जाता जाईना. या नाराजीमुळे आधी मुख्यमंत्री ठरवायला उशीर झाला. नंतर खातेवाटप बऱ्याच विलंबाने झाले. शपथविधीचा मुहूर्तही लवकर सापडला नव्हता. आता शपथविधी होऊन 17 दिवस उलटले तरी 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. काही कमी दर्जाचे खाते मिळाल्याने तर काही आवडीचे दालन न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितले जाते. मंत्र्यांच्या या नाराजीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकीनऊ आणले असून लाड खपवून घेतले जाणार नाहीत, तत्काळ पदभार स्वीकारा, असे आदेशच त्यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.

नऊ मंत्र्यांनी अजून स्वीकारला नाही पदभार

पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांमध्ये 6 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले या कॅबिनेट मंत्र्यांसह माधुरी मिसाळ (सामाजिक न्याय), आशीष जयस्वाल (अर्थ व नियोजन) आणि योगेश कदम (गृह) या राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधीही नागपूरमध्येच केला गेला. 21 तारखेला अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुंबईत मंत्र्यांच्या दालने वाटपावरून रुसवेफुगवे दिसून आले. आता दालने वाटप होऊनही 9 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे संबंधित खात्यांचे काम पूर्ण गतीने सुरू झालेले नाही. मंत्र्यांच्या या नाराजीमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा संताप झाला आहे. त्यामुळेच तत्काळ पदभार स्वीकारण्याचे फर्मानच त्यांनी काढल्याचे कळते.

दुखवट्यामुळे थांबलोय

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. तो दुखवटय़ाचा कालावधी 2 तारखेला संपत असून त्यानंतर सर्व मंत्री पदभार स्वीकारताना दिसतील, असा दावा क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स...
पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख
मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक
मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या
मुंबई विमानतळावर गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; बँकॉकहून आलेल्या केरळच्या प्रवाशाला अटक