नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनता मदतीपासून वंचित, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनता मदतीपासून वंचित, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनतेला मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम या सरकारने केल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मंत्रिमंडळ स्थापन होऊनही बिन खात्याच्या मंत्र्यांचं अधिवेशन झालं. मागील काळातील योजना, दिलेलं खोटे आश्वासनं व दिवा स्वप्न दाखवण्याचं काम या सरकारने केलं आहे. शेतकरी, कामगार, युवक व बेरोजगारांना कोणताही न्याय व मदत सरकारने जाहीर केली नसल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

एसटी बस खरेदीतील गैरव्यवहार, बोगस औषधे, राज्यातील बिघडलेली कायद्या सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात सरकारला सळो की पळो करून सोडलं. महाविकास आघाडीची हीच भूमिका यापुढे असेल. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे दानवे यांनी म्हटले.

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड फरार आहे. परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाणीत शॉक बसून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तरी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. कल्याण येथे परप्रांतीय माणसाने मराठी कुटुंबावर हल्ला केला, आदी घटना हे सरकार आल्यावर घडल्या असल्याचे दानवे म्हणाले.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी स्थिती राज्यात नाही. सरकारने 2024-25 वर्षांसाठी सादर केलेल्या पुरवणी मागणीत विकासासाठी सरकारने एक रुपया दिला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्यावर माफी मागण्याऐवजी त्यावर विरोधकांनी काय काय केलं हे भाजपचे नेते सांगत राहिले. त्यामुळे त्यांची आंबेडकर यांच्याविषयी भूमिका काय आहे हे स्पष्ट होते.

मराठवाड्यासाठी सरकारने सिंचन प्रकल्प जाहीर केले, मात्र त्याला निधी दिला नसल्याचा आरोप दानवे यांनी केला. कांदा निर्यात धोरण बदलण्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा, विमा, प्रोत्साहन नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असताना आरोपींना वाचवण्यासाठी हे सरकार काम करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

पुणे, मुंबई, नागपूर शहरात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पाशवी मताने निवडून आलेलं हे ईव्हीएम सरकार आहे. येणाऱ्या काळात न्याय देईल अशी सरकारची स्थिती नाही. रक्षकच भक्षक व मारेकरी झाले आहेत, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…