वर्किंग वुमनचा डाएट प्लान काय असतो माहीत आहे का?; वाचा डिटेल्स
महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या उमटवत असतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीत त्यांचंही मोठं योगदान आहेत. काही महिला तर घरातील काम सांभाळून नोकरी सांभाळतात. शिवाय मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष देतात. प्रचंड एनर्जीने काम करत असतात. त्यामुळे कदी कधी त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून त्या मेहनत घेत असतात. मात्र महिलांनी थोडं शरीराकडे लक्ष दिलं तर त्यांना तब्येतही सांभाळता येऊ शकते. त्यासाठी त्यांनी डाएटवर भर द्यायला हवा.
नोकरदार महिलांनी त्यांच्या आहार आणि फिटनेसला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. योग्य आहार न घेतल्यामुळे महिलांना थकवा आणि कमजोरी अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नवी दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जर तुम्ही नोकरदा महिला असाल, तर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य डाएट प्लान बनवणे खूप महत्त्वाचे आहे. डाएट प्लान तयार केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता, असं पालीवाल म्हणाल्या. नोकरदार महिलांनी एक दिवसाचा आहार घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
असा असावा नाश्ता
नोकरदार महिलांनी सकाळी 8 ते 10 यावेळेत रोज नाश्ता करावा. नाश्त्यात तुम्ही 2 स्लाईस ब्राऊन ब्रेड किंवा ओट्स पराठा, 1 कप दूध आणि सफरचंद-बनाना ज्यूस घेऊ शकता. नाश्त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सफरचंद, केळी, द्राक्षे किंवा थोड्या भूईमुगाच्या शेंगा किंवा बदाम खा.
दुपारचं जेवण असं असावं
दुपारी 1 वाजता नियमितपणे जेवण करण्याची सवय लावून घ्या. दुपारच्या जेवणात तुम्ही थोडा भात, 4-5 चपात्या, 1 वाटी मिक्स भाजी, दही आणि कोशिंबीर खाऊ शकता. संध्याकाळी हलका नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एक कप चहा किंवा कॉफी आणि बदाम खाऊ शकता.
रात्री काय खाल?
तुमचं रात्रीचं जेवण 8 ते 9 वाजेच्या दरम्यान असायला हवं. तुम्ही रात्रीचं जेवण हलकं ठेवू शकता. रात्री मटकी किंवा तूर डाळीसोबत भात खाऊ शकता. त्याशिवाय फक्त खिचडी ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर जायफळासोबत एक ग्लास दूध प्यायला विसरू नका. जायफळासोबत दूध प्यायल्याने चांगली झोप येते आणि तणाव कमी होतो.
तुम्ही दररोज सकाळी सुमारे अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या चयापचय प्रक्रियेत वेग येतो आणि त्यामुळे अन्न पचनास कोणतीही अडचण येत नाही. व्यायाम केल्यामुळे फॅटही बर्न होते, असं पालीवाल सांगतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List