गोड खाण्याची इच्छा कमी करतील हे 4 पदार्थ, आहारात करा यांचा आवर्जून समावेश
जवळपास सगळ्यांनाच मिठाई खायला मोठ्या प्रमाणात आवडते. पण गोड पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. गोड पदार्थ किंवा मिठाई हे प्रमाणात खाणेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र ज्यांना मिठाई आवडते त्यांना ती प्रमाणात खाणे जमत नाही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण तुम्ही याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. जास्त गोड खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गोड पदार्थाचे जास्त सेवन केल्याने वजन वाढण्याची समस्या होते त्यासोबतच शरीरातील ऊर्जाही कमी होते. याशिवाय गंभीर आजारांचा धोकाही सांभावतो. म्हणूनच गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुम्हालाही गोड पदार्थ खायला मोठ्या प्रमाणात आवडत असेल तर हे चार आरोग्यदायी खाद्यपदार्थ तुम्हाला गोड खाण्यापासून थांबवू शकतील.
सुक्यामेव्याचा करा आहार समावेश
जर तुम्हाला गोड पदार्थ मिठाई खायला आवडत असेल आणि तुमची मोठ्या प्रमाणात गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात सुक्यामेव्याचा समावेश करू शकता. सुक्यामेव्यामध्ये केवळ निरोगी चरबी नसते तर त्यामध्ये प्रथिने आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे काजू आणि बदाम यासारख्या सुक्यामेव्यांचा आहारात समावेश करा.
ग्रीक योगर्ट ठरेल फायदेशीर
ग्रीक दही देखील तुमची गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करते. ग्रीक दह्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असल्याने त्याचे सेवन केल्यास तुम्हाला गोड खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. तुम्हाला हवे असल्यास त्यात तुम्ही ताजी फळे किंवा सुकामेवा टाकून खाऊ शकता.
बेरीही करतील मदत
गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी बेरीज देखील खूप मदत करतात. हे फक्त चवीला गोड नाही तर यामध्ये अँटिऑक्सिडंट, फायबर आणि पाण्याचे प्रमाणही चांगले असते. बेरी ह्या नैसर्गिकरीत्या गोड असतात त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि तुमच्या कॅलरीज देखील कमी होतात. म्हणून तुमच्या आहारात ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रसबेरी यांचा समावेश करा.
रताळ्यामुळे देखील होईल गोड खाण्याची इच्छा कमी
रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे तुमची ऊर्जा पातळी सुधारते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. रताळे हे नैसर्गिकरीचा गोड असतात. त्यामुळे तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा होणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List