ऐश्वर्या रायचा भरजरी लेहंग्यांची थेट ऑक्सरमध्ये निवड; नक्की घडलंय काय?

ऐश्वर्या रायचा भरजरी लेहंग्यांची थेट ऑक्सरमध्ये निवड; नक्की घडलंय काय?

ऐश्वर्या राय सध्या तिच्या आणि अभिषेकच्या नात्यावरून बरीच चर्चेत असते. तसचे अभिषेक आणि तिच्याबद्दलच्या कोणत्याना कोणत्या चर्चा या होतच असतात. नुकतेच आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले होते तसेच त्यांनी डान्सही केला होता. याबद्दलही बऱ्याच चर्चा होताना पाहायला मिळाल्या. पण आता ऐश्वर्या राय एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

मिस वर्ल्ड असणारी ऐश्वर्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयासाठी सुद्धा ओळखली जाते. ऐश्वर्या राय ज्या कारणाने चर्चेत आली आहे ते कारण आहे तिचा लेहंगा. होय, एका चित्रपटात घातलेल्या तिच्या नक्षीदार लेहंग्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. ऐश्वर्याचा ‘जोधा-अकबर’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.

ऐश्वर्या रायच्या लेहंग्याची चर्चा जगभर 

ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी ‘जोधा-अकबर’ मध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात दोघांच्याही अभिनयाचं तर कौतुक झालं होतं. तसेच या चित्रपटातील गाणीदेखील प्रसिद्ध झाली होती. आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या नक्कीच फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त हिट ठरला. तसेच या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक फार चर्चेत आला होता.

ऐश्वर्याने या चित्रपटात सुंदर असे भरजरीत लेहंगे, आकर्षक दागिने घातले होते. याची गाणी सुद्धा खूप गाजली होती. 16 वर्षांपूर्वी आलेल्या जोधा-अकबर या चित्रपटात ऐश्वर्याने घातलेल्या लेहंग्याची आता इतक्या वर्षांनंतर दखल घेण्यात आली आहे.

ऐश्वर्याच्या लेहंग्याची थेट ‘ऑस्कर’मध्ये

ऐश्वर्याच्या लेहंग्याची थेट ‘ऑस्कर’मध्ये निवड झाली आहे. हा सुंदर लेहंगा ऐश्वर्याने चित्रपटात लग्नाच्या सीनवेळी घातला होता. या लेहंग्याला सुप्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाने तयार केले आहे. हा नक्षीदार लेहंगा म्हणजे एक अद्वितीय मास्टरपीस आहे. तो लेहंगा आता जगभरातील लोकांना दाखवण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Academy (@theacademy)

ऑस्कर म्यूझियमने या सुंदर भारतीय पोषाखाचा त्याच्या आगामी प्रदर्शनामध्ये समावेश केला आहे. लेहंग्याची विशेषता म्हणजे यावर केलेले बारीक विणकाम आणि भरतकाम. यावरील नक्षीदार भरतकाम भारतीय परंपरिक कलेचा एक उत्तम नमुना आहे.

विविध रत्नांनी जडीत असा हा लेहंगा 

हा लेहंगा विविध रत्नांनी जडीत असून ऐश्वर्याने या लेहंग्यावर घातलेल्या दागिन्यात सुद्धा सुंदर कुंदनांचा मोर बनवलेला आहे. या राजेशाही कोस्ट्युममध्ये ऐश्वर्या खूपच आकर्षक दिसतेय. लोकांनी तिच्या या लूकला प्रचंड पसंती दिली आहे. ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ ने यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात या लेहंगा आणि दागिन्यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे.

ऑस्कर पुरस्कारांसाठी प्रसिद्ध अ‍ॅकेडमीने याची माहिती इनस्टग्रामवर दिली असून जोधा-अकबरच्या एका सीनचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘जोधा अकबर’चे काही सीन्सही आहेत, ज्यात हृतिक रोशन अकबरच्या भूमिकेत दिसत आहे. ‘जोधा अकबर’ मधील लाल रंगाचा लेहंगा अजूनही लोकांना आवडतो.

अ‍ॅकेडमीने पोस्टमध्ये त्याचे वर्णन ‘राणीसाठी परफेक्ट’ असे कॅप्शन देऊन केले आहे. भारतीय पारंपारिक कलेला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हा लेहंगा करणार आहे. हा फक्त एक आउटफिट नाही तर भारताच्या समृद्ध कलेचं मोठं उदाहरण आहे असं म्हणता येईल.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला ‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 9 जानेवारीला होणारा स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पाडेक्स) पुन्हा पुढे ढकलला. दोन अवकाश उपग्रहांमध्ये जास्त अंतर...
अदानीचा बुलडोझर शिवसेनेने रोखला, वांद्र्याच्या भारतनगरमधील ‘एसआरए’च्या कारवाईला स्थगिती
पैठणच्या मोर्चात धस यांचा ‘डायरीबॉम्ब’!कराडचे पुण्यात पाच फ्लॅट, सात दुकाने, बार्शी आणि माजलगावात दीडशे एकर जमीन
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण; पोलिसांची सहा ठिकाणी झाडाझडती, गुह्याची व्याप्ती मोठी, नवीन बाबींचा उलगडा
सुप्रीम कोर्टासारखं बेशिस्त न्यायालय पाहिलं नाही! न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आसुड
दोन वर्षांनंतर सरकारला जाग, साडेपाच लाख शेतकऱ्यांना 535 कोटींची भरपाई
जगातील पॉवरफुल पासपोर्टची रँकिंग जाहीर, हिंदुस्थानचे स्थान घसरले