जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई, दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना केलं अटक
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात हिंदुस्थानी सैन्याने मोठी कारवाई केली आहे. येथे तपासणीदरम्यान हिंदुस्थानी जवानांनी दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना पकडलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर पोलीस, 32 आरआर आणि सीआरपीएफ या सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने यारबुग येथील चौकीवर तपासणीदरम्यान दोघांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. याआधी अन्य एका कारवाईत बांदीपोरा येथे एका दहशतवाद्याच्या सहकाऱ्याला शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली होती.
राशिद अहमद भट आणि साजिद इस्माईल हारू, अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या साथीदारांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन हातबॉम्ब (चायनीज) आणि 10600 रुपये रोख जप्त करण्यात आले. सैन्याने संशयिताला इशाराही दिला होता, पण जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा दलांनी त्याला पकडले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List