ब्राझीलमध्ये भीषण अपघात, बस ट्रकवर आदळून 38 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

ब्राझीलमध्ये भीषण अपघात, बस ट्रकवर आदळून 38 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात भीषण अपघात घडला आहे.बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस ट्रकवर आदळली. या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून त्यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस साओ पाउलोहून निघाली असून त्यात 45 प्रवासी होते, मात्र वाटेत तिचा टायर फुटला आणि नियंत्रण सुटून ट्रकला धडकली. यानंतर एक कारही आली आणि बसला धडकली, ज्यामध्ये तीन प्रवासी होते, ते बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात शनिवारी पहाटे 4च्या सुमारास घडला.  मिनास गेराइस अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे की, हा अपघात महामार्ग BR-116 वर झाला. अपघातानंतरच्या छायाचित्रांमध्ये वाहनाचा ढिगारा दिसत आहे. बसला आग लागल्याचे चित्रही समोर आले असून, त्यात बस जळताना दिसत आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मिनास गेराइसचे गव्हर्नर रोम्यू झेमा यांनी ट्विटरवर सांगितले की, त्यांनी टिओफिलो ओटोनी येथील BR-116 वर झालेल्या दुःखद अपघातात “पीडितांना मदत करण्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे” आदेश दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’ कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
कल्याण पश्चिमेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण...
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल
मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता
अल्लू अर्जुन अखेर संतापला; गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशारा; म्हणाला “असं करणं थांबवलं नाहीतर…”
फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता