‘पुष्पा 2’ ने बाहुबलीचा विक्रम मोडला, काही तासातच केली एक हजार कोटींची कमाई

‘पुष्पा 2’ ने बाहुबलीचा विक्रम मोडला, काही तासातच केली एक हजार कोटींची कमाई

तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने रेकॉर्डब्रेक कमाई करत बाहुबलीचाही विक्रम मोडला आहे. ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल करत 22 डिसेंबर रोजी काही तासातच एक हजार कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय भाषिक चित्रपटाने असा रेकॉर्ड केला नाही.

‘पुष्पा 2’ ने अठराव्या दिवशी आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाहुबली-2 चा विक्रम मोडला आहे. दुपारी 3.25 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘पुष्पा 2’ ने 1043.95 कोटींची कमाई केली आहे. यानंतर ‘पुष्पा 2’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा 2’ ने सतराव्या दिवसापर्यंत 1029.9 कोटींची कमाई केली. आतापर्यंतचे चित्रपटाचे कलेक्शन पाहता ‘पुष्पा 2’ आणखी कमाईमध्ये विक्रम करेल असे बोलले जात आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2’ चे सुकुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. याआधी 2021 मध्ये ‘पुष्पा द राईझ’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचली होती. ‘पुष्पा’च्या यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी ‘पुष्पा 2’ची घोषणा केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादांसोबतची बैठक सपंली, भेटीनंतर राजीनाम्यावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर अजितदादांसोबतची बैठक सपंली, भेटीनंतर राजीनाम्यावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या...
Santosh Deshmukh murder case : आकाच्या आकाचे नाव पहिल्यांदाच समोर, सुरेश धस यांचा मोठा दावा
17 व्या वर्षी लग्न, लग्नापूर्वीच आई, आता 47 व्या वर्षी करतेय दुसरं लग्न; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री
डायबिटीज असणाऱ्यांनी दिवसभरात किती चपात्या खाव्यात? तज्ज्ञांनी सांगितला महत्त्वाचा सल्ला
लहान मुलांना गुटगुटीत आणि सुदृढ बनवायचंय? ‘या’ पद्धतीनं ड्राय फ्रुट्सचं सेवन करा….
Santosh Deshmukh संतोष देशमुख हत्याप्रकरणी तीन आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
Photo – माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभिवादन