मुंबईत बॉम्बस्फोट होणार,मोदी यांना मारण्याचा कट; वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचे संदेश येणारे सत्र सुरूच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात आहे. तसेच मुंबई आणि धनबाद येथे बॉम्बस्फोट करण्याच्या काहीजण तयारीत असल्याचे नव्याने आलेल्या धमकीच्या संदेशात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात संदेश पाठविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी याना मारण्याचा कट रचला जात असल्याचा धमकीचा संदेश शनिवारी सकाळी वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला मिळाला. त्या संदेशात काही व्यक्तींचा नामोल्लेख करून ते लोक एका कंपनीत शस्त्र बनवत असून ते मोठा कांड करण्याच्या तयारीत आहेत. एक व्यक्ती धनबाद तर दुसरा मुंबईत बॉम्बस्फोट घडविणार आहे. त्यांनीच पंतप्रधानांना मारण्याचा कट रचला असल्याचेही संदेशात म्हटले आहे. धमकीचा संदेश आला त्या क्रमांकावरून पोलीस शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List