मीरा रोडमध्ये अतिक्रमण पथकावर हल्ला; महिला पोलीस अधिकाऱ्याचेही डोके फोडले

मीरा रोडमध्ये अतिक्रमण पथकावर हल्ला; महिला पोलीस अधिकाऱ्याचेही डोके फोडले

बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण पथकावर हल्ला केल्याची घटना मीरा रोडच्या शांती पार्कमध्ये घडली आहे. यावेळी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यातदेखील काठी मारल्याने त्यांचे डोके फुटले आहे. इतकेच नाही तर काही पोलिसांना हल्लेखोरांनी नखांनी ओरबडले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळावर धाव घेतली.

मीरा रोड पूर्वेला शांती पार्क भागात एका इमारतीच्या मनोरंजन मैदानाच्या जागेवर श्री गोवर्धन नाथजी हवेली व जय श्री बाल गोपाळ मंडळाने बेकायदा बांधकाम केले होते. यावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र बांधकाम तोडत असताना राकेश कोटीयन यांच्यासह १० ते १५ जणांनी कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली. जेसीबी अडविण्यात आल्याने पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राकेश कोटीयन याला बाजूला करत असताना त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वसन विरडिया या महिलेने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यात काठीने हल्ला केला. यात बुरांडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पाचजणांवर गुन्हा

जमावामधील भावना बगालिया, सुनीता विरडिया, जयश्री सवानी यांनी महिला पोलीस अंमलदार लालन खोजे यांच्या हातांवर नखांनी ओरबाडे केले. याप्रकरणी आरोपी राकेश कोटीयन, वसन विरडिया, भावना बगालिया, सुनीता विरडिया, जयश्री सवानी आदींविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’ कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
कल्याण पश्चिमेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण...
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल
मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता
अल्लू अर्जुन अखेर संतापला; गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशारा; म्हणाला “असं करणं थांबवलं नाहीतर…”
फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता