एसपी कॉवत लागले कामाला; मस्साजोगला पहिले प्राधान्य, आरोपींना तात्काळ अटक करणार
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यानंतर दुसर्याच दिवशी संभाजीनगरचे उपायुक्त नवनीत कॉवत यांची बीडला एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती होताच शनिवारी रात्री साडेदहा वाजता नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार स्विकारला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बीड जिल्हा भयमुक्त करण्याचे आव्हान मी स्विकारले आहे. पहिले प्राधान्य मस्साजोगला असणार आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक केली जाणार आहे. आत्ता लगेच जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांची आपण बैठक घेत आहोत. तसेच मस्साजोगलाही देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन संवाद साधणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
माझे ऑफीस सामान्य जनतेसाठी कायम खुले राहिल. पोलीस हे जनतेसाठी आहेत. बीड जिल्ह्यातील दहशत आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान आपण स्विकारत आहोत. भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. जनतेने या साठी आम्हाला सहकार्य करावें. आपल्या भागातील समस्या, अडीअडचणी सांगाव्यात त्यावर तातडीने उपाययोजना केली जाणार आहे असा विश्वास नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List