LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; अद्याप नॉमिनींकडून दावा नाही

LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; अद्याप नॉमिनींकडून दावा नाही

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 880.93 कोटी रुपयांची दावा न केलेली मॅच्युरिटी रक्कम आहे. सरकारी माहितीनुसार, एकूण 372,282 पॉलिसीधारकांनी त्यांच्या मॅच्युरिटी बेनिफिटचा दावा केलेला नाही. पॉलिसी मॅच्युअर होऊन 3 वर्ष झाली तरी त्यावर कोणीही दावा केलेला नाही. त्यामुळे याबाबत माहिती घेत नॉमिनी या रकमेवर दावा करू शकतात.

1956 पर्यंत 154 भारतीय विमा कंपन्या, 16 विदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह कंपन्या भारतात कार्यरत होत्या. 1सप्टेंबर 1956 रोजी सरकारने या सर्व 245 कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ सुरू केले. तेच आता LIC म्हणून ओळखले जाते. सध्या 25 कोटींहून अधिक लोकांकडे LIC पॉलिसी आहेत. तसेच दावा न केलेली सुमारे 881 कोटी रुपये LIC कडे पडून आहे. यासाठी एलआयसीने मॅच्युअर पॉलिसीमध्ये आपला दावा आहे काय, हे शोधण्यासाठी प्रक्रियेची माहिती दिली आहे.

LIC वेबसाइट https://licindia.in/home ला भेट द्या
होमपेजवर ग्राहक सेवा वर क्लिक करा.
यावर जा आणि पॉलिसीधारकांच्या अनक्लेम्ड रकम पर्याय निवडा.
पॉलिसी क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक यासारखे आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
यानंतर तुम्हाला अनक्लेम मॅच्युरिटी असलेल्या पॉलिसीची माहिती मिळेल.

कोणत्याही एलआयसी कार्यालयातून दावा फॉर्म मिळवा किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा. फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जसे की पॉलिसी दस्तऐवज, प्रीमियम पावत्या आणि लागू असल्यास मृत्यू प्रमाणपत्र संलग्न करा. एलआयसी कार्यालयात कागदपत्रांसह पूर्ण केलेला फॉर्म सबमिट करा. LIC तुमच्या दाव्याचे पुनरावलोकन करेल आणि मंजूर केल्यास, ते तुमची दावा असलेली रक्कम जारी करेल.

नियमांनुसार, ज्या पॉलिसींच्या मॅच्युरिटी रकमेवर कोणी दावा केलेला नाही, अशा पॉलिसी दावा न केलेल्या खात्यात जमा केल्या जातात. 10 वर्षे हक्क नसलेली रक्कम राहिल्यास ती ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये टाकली जाते. हा पैसा वृद्धांच्या देखभालीसाठी खर्च केला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास...
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल