अतुल सुभाषनंतर मध्य प्रदेशात आणखी एकाने उचलले टोकाचे पाऊल, व्हिडीओ बनवून सांगितले कारण
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आता मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात पत्नी आणि एका व्यक्तीवर छळ केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ बनवून एका 37 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
या व्यक्तीने गुरुवारी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली, आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तो व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्याचे पोलीस अधिक्षक मनोज कुमार राय यांनी सांगितले. सुमारे चार मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये पिडीत व्यक्तीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीने त्याचा छळ केला, त्यामुळे त्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
तो माणूस व्हिडीओत वारंवार म्हणाला की तो फार अस्वस्थ आहे. पुरुष आरोपीने त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याने व्हिडीओत केला आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. त्याला न्याय मिळायला हवा आणि त्याची पत्नी आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पुरुषाला शिक्षा झाली पाहिजे. त्याने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीसोबत राहायचे आहे, मात्र तिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. व्हिडीओमधून समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.बेंगळुरूमधील एआय अभियंत्याच्या आत्महत्येनंतर काही आठवड्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List