लक्षवेधक – ऍक्सिस बँकेचा ग्राहकांना जोरदार झटका

लक्षवेधक – ऍक्सिस बँकेचा ग्राहकांना जोरदार झटका

ऍक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना नववर्षाआधीच जोरदार झटका दिला. ऍक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱयांना हा झटका असून बँकेने क्रेडिट कार्डच्या नियमात काही बदल केले आहेत. हे बदल फायनान्स चार्ज, कॅश पेमेंट फीस, करन्सी कन्वर्जन मार्कअप, फ्युल आणि युटिलिटी ट्रांझॅक्शनसह अन्य शुल्कांवर लागू केले आहेत. नवीन नियम 20 डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. कॅश पेमेंटवर चार्ज आता 100 रुपयांऐवजी 175 रुपये करण्यात आला आहे. एक स्टेटमेंट पीरियडमध्ये 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या फ्युल ट्रांझॅक्शनवर 1 टक्का चार्ज आकारला जाणार आहे.

व्हॉट्सऍपवरून गर्लफ्रेंडची अदलाबदल

बंगळुरूमध्ये एक संतापजनक आणि धक्कादायक घडना उघडकीस आली. व्हॉट्सऍपवरून गर्लफ्रेंडची अदलाबदल करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश केंद्रीय गुन्हे शाखेने केला. स्विंगर्स रॅकेटला पकडल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. एका महिलेला या ग्रुपमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, महिलेने नकार दिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. हरिश आणि हेमंत अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली. हे दोघे पाटर्य़ांच्या नावाखाली जोडप्यांना पार्टनर स्वॅपिंगमध्ये अडकवत असत. महिलेने हे सर्व करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या महिलेचे एका आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. याचाच गैरफायदा तो घेत होता.

व्वा! आयफोन 15 वर बंपर डिस्काऊंट

आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱया ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन 15 वर सद्या बंपर डिस्काऊंट मिळत आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर आयफोनवर बम्पर सूट देण्यात आलेली आहे. फ्लिपकार्टवर आयफोन 15 फक्त 58,499 रुपयांना तर आयफोन 15 प्लस 69,999 रुपयांना विकला जात आहे.

टाटा नाव गुगलवर सर्वाधिक सर्च

2024 या वर्षात उद्योगपती रतन टाटा यांचे नाव ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च करण्यात आले. गुगलकडून या वर्षाची यादी जाहीर करण्यात आली असून यात रतन टाटा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि डोनाल्ट ट्रम्प हे नाव सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आले. रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.

नोकरीची संधी! मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई मेट्रोअंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 27 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 28 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पुष्पा-2’ने कमावले 700 कोटी रुपये

अल्लू अर्जुनचा सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘पुष्पा-2’ या चित्रपटाने अवघ्या 15 दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱया हिंदी चित्रपटाचा किताबसुद्धा आपल्या नावावर केला. पुष्पाने अवघ्या 15 दिवसांत 700 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या आठवडय़ाप्रमाणे दुसऱया आठवडय़ातही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास...
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल
कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’
‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल